Friday, March 23, 2018

REALITY OF LIFE #1

                                                            जीवन विरोधाभासी आहे !!!
                                   जीवनामध्ये कधी काय घडेल ते सांगता येत नाही . आज करोडपती असणारा उद्या रोडपती तर आज रोडपती  असणारा उद्या करोडपती होतो .कितीही विरोध केला तरी देव किंवा एखाद्या अद्भुत अविश्वसनीय अदृश्य अशा शक्तीचे अस्तित्व नाकारता येत नाही . आपण म्हणतो यश, पैसे, समृद्धी हे कष्टाने मिळते .परंतु मग तो बांधकाम मजूर  तर मुकेश अंबानी पेक्षा खूप जास्त कष्ट करतो पण पैसे कोणाकडे जास्त? म्हणजेच कोठेतरी कोणतीतरी शक्ती आपले अस्तित्त्व ठरवते . माझे असे मत नाही कि पुण्यामुळे किंवा देवामुळे  सर्व काही प्राप्त होते ,परंतु आपले कर्म किंवा नशीब जीवनात आमूलाग्र बदल घडवते .
                                       आज जे अंकुर असते ते उद्या महाकाय वृक्ष होते आणि तेच झाड वादळ आल्यानंतर मातीमोल होते . म्हणजेच परिस्थिती सतत बदलते . हे परिस्थितीचे चक्र फिरत फिरत शेवटी पूर्णपणे विरोधी होते .म्हणजे नवीन बाळ ज्या प्रमाणे माती खेळात असते त्याचप्रमाणे त्याची मृत्यूनंतर मातीच होते .हेच शाश्वत सत्य आहे कि आपण माणसे या जगात फक्त बदल सहन करू शकतो कारण कर्माशिवाय आपल्या हातात काहीच नसते . आज आपण आजारी पडलो ,आपल्या लोकांनी आपली सेवा केली,पण तीच माणसे काही काळाने आपल्या परिस्थतीत  जातील आणि आपण त्यांच्या ! हि शक्यता नाकारता येत नाही . हे तर एक उदाहरण आहे . परंतु हेच सत्य आहे कि जीवन हा एक भूलभुलैया आहे ज्यामध्ये आपण एका  टोकावरून दुसऱ्या टोकावर जाताना अनेकवेळा तिथेच फिरतो किंवा फक्त आपली जागा बदलत राहतो .
                                         शेवटी हा विचार माझा आणि माझ्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनातून आहे .त्यामुळे नक्कीच या मतालाही  विरोध असणारच . एवढेच सांगतो ''पुढच्या माणसाशी वागताना त्याच्या परिस्थितीत जाऊन वागा ' असे वागाल तर जीवन सोपे सुन्दर आनंदी होउन  जाईल  ... 

                              

REALITY OF LIFE #1

                                                              जीवन विरोधाभासी आहे !!!                                    जीवनामध्ये कध...